BJP Candidate First List Leader Resignations : भाजपने बुधवारी हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 साठी आपली 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, भाजपची यादी जाहीर होताच नेत्यांची बंडखोर वृत्ती समोर येऊ लागली आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या मंत्री आणि आमदारांनी राजीनामा दिला आहे.
पहिली यादी जाहीर झाल्यापासून रानिया, मेहम, ठाणेसर, उकलाना, पृथला, रेवाडी, रतिया, बध्रा या भागात बंडखोरी दिसून आली. रानियाचे माजी आमदार रणजित चौटाला यांनी समर्थकांची बैठक घेतली. आणि राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी त्यांनी तिकीट रद्द झाल्यास बंडखोरीचे संकेत होते.
तिकीट नाकारल्यानंतर रतिया येथील भाजप आमदार लक्ष्मण नापा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते आत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत त्यांनी स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे. दुसरीडे रोहतक जिल्ह्यातील मेहम मतदारसंघातील भाजपचे २०१९ चे उमेदवार समशेर सिंग खारखरा, चरखी दादरी जिल्ह्यातील भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ भल्ले यांनीही राजीनामा दिला आहे. याशिवाय सोनीपत जिल्हा उपाध्यक्ष संजीव वालेचा यांनीही राजीनामा दिला आहे.
दरम्यान, हिसारच्या उकलाना मतदारसंघातून जेजेपीचे माजी आमदार अनुप धनक यांना तिकीट मिळाल्यानंतर नाराज शमशेर गिल आणि माजी उमेदवार सीमा गबीपूर यांनीही पक्षाला रामराम ठोकला. कमल गुप्ता यांना हिसारमधून तिकीट मिळाल्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तरुण जैन यांनी पक्षाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी आधीच घोषणा केली होती. सोनीपतमधील भाजप पूर्वांचल सेलचे सहसंयोजक संजय कॉन्ट्रॅक्टर यांनीही भाजप सोडण्याची घोषणा केली आहे.
अनेक नेते नाराज
भाजपची यादी जाहीर होताच पक्षातील जुने नेते तिकीट न मिळाल्याने नाराज झाल्याचे बोलले जात आहे. यामध्ये अनेक माजी मंत्री आणि आमदारांचा समावेश आहे.