Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सव आणि कोकण हे समीकरण फार अनोखं आहे. कोकणात गणेशोत्सवाचा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. अशास्थितीत कोकणापासून दुसऱ्या शहरात गेलेली लोक पुन्हा आपल्या गावी येऊन या सणात रंग भारतात, जरवर्षी लाखो लोक गणेशोत्सवात कोकणाचा प्रवास करतात. यामध्ये चाकरमान्यांची संख्या फार मोठी असते.
दरम्यान आता, राज्यसरकारने एक खुशखबर दिली आहे. गणेश गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना टोलमुक्तीला लाभ मिळणार आहे. गणेशोस्तवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी आणि इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासंबंधित शासनने परिपत्रक देखील काढले आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई-पूण्यातून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त कोकणात जातात. या गणेश भक्तांसाठी सरकारने ही खुशखबर दिली आहे. दि.०५.०९.२०२४ ते दि.१९.०९.२०२४ या कालावधीत मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गर, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल माफ करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. दरम्यान, कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांना आणि वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना सवलत देण्यात येत आहे.
असा घ्यावा लागेल लाभ
ज्या भाविकांना टोलमाफी हवी आहे, त्यांना आपल्या वाहनावर “गणेशोस्तव २०२४, कोकण दर्शन” अशा आशयाचे स्टीकर तसेच त्यावर गाडी क्रमांक चिटकावे लागणार आहे. यामध्ये चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन ते स्टीकर्स चिटकावे लागेल. आवश्यक त्या संख्येनुसार हे स्टीकर परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेसमध्ये मिळतील.