उत्तर सिक्कीममध्ये भारत-चीन सीमेजवळ भारतीय लष्कराच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये ४ जवान शहीद झाले आहेत. हे वाहन रस्त्यावरून घसरून 800 फूट खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. लष्कराचे वाहन पश्चिम बंगालमधील पेडोंग येथून सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यातील सिल्क मार्गावरुन झुलुककडे जात असताना हा अपघात झाला.
दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि लष्कराचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. येथे अजून बचावकार्य सुरू असून, मृतांची माहिती लवकरच समोर येईल.
मृतांची ओळख पटली आहे. यामध्ये चालक प्रदीप पटेल मूळचा मध्य प्रदेश, कारागीर डब्ल्यू पीटर मूळचा मणिपूर, नाईक गुरसेव सिंग मूळचा हरयाणाचा आणि सुभेदार मूळचा तामिळनाडूचा ओळख पटली आहे. चालकासह सर्व सैनिक पश्चिम बंगालमधील बिनागुरी येथील एनरूट मिशन कमांड युनिटचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे वाहन पश्चिम बंगालमधील पेडोंग येथून सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यातील सिल्क मार्गावरील झुलुककडे जात असताना हा अपघात झाला. लष्कराचे हे वाहन रस्त्यावरून घसरून 700 ते 800 फूट खोल दरीत पडले. या घटनेबाबत भारतीय लष्कराकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.