Lalbaugcha Raja : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे. राजाची पहिली झलक समोर येताच सर्वत्र त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यावर्षी लाल बागच्या राजामध्ये काय वेगळेपण आहे जाणून घेऊया…
यावर्षी सर्वात चर्चेचा विषय म्हणजे राजाच्या डोक्यावर असलेला 16 कोटी रुपयांचा मुकुट. नेहमीप्रमाणे यावर्षी देखील जय जयच्या घोषात गणपती बाप्पाचे आगमन झाले. बाप्पाच्या आगमनावेळी नेहमीप्रमाणे भाविकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली.
आपण सगळेच जाणतो लालबागचा राजा हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणेश मंडळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून व्हीव्हीआयपी तसेच सेलेब्रिटी येथे दर्शनासाठी येतात. लाल बागच्या राजाला नवसाचा गणपती देखील म्हणतात, दरवर्षी मोठ्या आशा घेऊन भक्त येथे दर्शनाला येतात. गणपती बाप्पाचे आगमन 7 सप्टेंबर रोजी होणार असून, आज हरतालिका आहे. हरतालिका व्रत हे माता पार्वती आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केलं जातं.
#WATCH | First look of Mumbai's Lalbaugcha Raja unveiled ahead of Ganesh Chaturthi pic.twitter.com/rZ7G1QZ5zv
— ANI (@ANI) September 5, 2024
उद्यापासून दर्शनाला सुरुवात
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सुधीर सीताराम साळवी म्हणाले आहेत, “लालबागच्या राजाचे पहिले दर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने झाले आहे. मंडळाची तयारी चांगल्या पद्धतीने झाली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ओढ लागली आहे. उद्यापासून आम्ही लोकांना दर्शन देऊ.
मुंबईतील लालबागच्या राजाच्या मूर्तीचा भव्य देखावा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. मूर्तीची रचना दरवर्षी बदलत राहते. यावर्षी देखील असेच काहीसे पाहायला मिळाले. गणेशोत्सव काळात येथे मोठ्या संख्येने लोक दर्शन घेण्यासाठी येतात. राजाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लोक येतात. गेल्या काही वर्षांत लालबागच्या राजाची ख्याती आणखी वाढली आहे.