Mumbai Times Tower Building : महाराष्ट्रातील मुंबईत शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल परिसरात असलेल्या टाइम्स टॉवरला आज सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) आगीच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
टाइम्स टॉवर ही परळ पश्चिमेतील 7 मजली व्यावसायिक इमारत आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, लोअर परळच्या कमला मिल कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या टाइम्स टॉवरमध्ये सकाळी 6.30 च्या सुमारास आग लागली. ही आग आता आटोक्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे, मात्र वायर आणि एसीमध्ये आग लागल्याने अजूनही धुराचे लोट दिसत आहेत. धूर ओसरल्यानंतर शोध आणि बचाव कार्य सुरू केले जाईल. सध्या आत कोणीही अडकलेले नाही असे वृत्त आहे. येथे आग कशी लागली याबाबत कोणतीही माहिती नाही, त्याचा शोध आता घेण्यात येत आहे.
#WATCH | Maharashtra | Fire tenders carry out operation to douse the fire that broke out in Times Tower building in Lower Parel West, Mumbai. No injuries reported. 9 fire tenders at the spot. pic.twitter.com/LDnUqDbfk8
— ANI (@ANI) September 6, 2024
याआधीही कमला मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंटला आग लागली होती
याआधी 29 डिसेंबर 2017 रोजी कमला मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंटमध्ये आग लागली होती. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय सुमारे १९ जण गंभीर जखमी झाले होते. कमला मिल ही व्यावसायिक बिल्डिंग आहे. यात जवळपास 34 रेस्टॉरंट, बार आणि अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत.
2017 मध्ये कमला मिल्स कंपाऊंडमधील मोजोज बार आणि रेस्टॉरंटमध्ये ही आग लागली होती. काही मिनिटांतच आगीने संपूर्ण रेस्टॉरंटला वेढले. मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश होता. ज्या रेस्टॉरंटच्या टॉप फ्लोवरवर पार्टीत सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या, या अपघातात बहुतांश लोकांचा गुदमरून मृत्यू झाला होता.