Devendra Fadnavis : राज्यात सत्ताधारी पक्षावर विरोधकांकडून अनेकदा जोरदार टीका होत असते. राज्यात येणारे प्रकल्प परराज्यात पाठवले जातात अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. नवनवीन उद्योगांसाठी गुजरातला प्राधान्य दिले जाते. असा आरोप विरोधकांकडून अनेकवेळा करण्यात आला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झाली आहे असे म्हणत आकडेवारी देखील सादर केली आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी आम्ही अडीच वर्षात पाच वर्षांचे काम करून दाखवू असल्याचे बोलले आहे.
3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक अडीच वर्षात महाराष्ट्रात आणून दाखवली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. X वर त्यांनी याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी गुंतवणुकीची आकडेवारी देखील दिलेली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या महिन्यांमध्ये एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात झालेली आहे असे त्यांनी सांगितले आहे.
अभिनंदन महाराष्ट्र !
अतिशय आनंदाची बातमी !!
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के
परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात !!!गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा… pic.twitter.com/8XT2n7e0w2
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 6, 2024
तसेच इतर राज्यांमध्ये कर्नाटकला 19,059 कोटी रुपये गुंतवणूक झालेली आहे तर गुंतवणुकीत तिसर्या क्रमांकावर दिल्ली असून तिथे 10,788 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चौथ्या क्रमांकावरील तेलंगणामध्ये 9023 कोटी ,पाचव्या क्रमांकावरील गुजरातमध्ये 8508 कोटी तसेच सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडूमध्ये 8325 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
दरम्यान, सातव्या क्रमांकावर हरयाणा असून 5818 कोटी रुपये याठिकाणी गुंतवणूक केली गेली.आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेशमध्ये 370 कोटी तसेच नवव्या क्रमांकावरील राजस्थानमध्ये 311 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वात जास्त गुंतवणूक झाली असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.