Ganesh Chaturthi : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा मुंबईतील लालबागचा राजा गणपती मंडळात सहभागी झाला आहे. अनंत अंबानी यांना मुंबईच्या प्रतिष्ठित ‘लालबागच्या राजा’चे मानद सदस्यत्व देण्यात आले आहे, मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनंत अंबानी यांना मानद सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि आता त्याला मंजुरी देण्यात आली.
मंडळाच्या एका ज्येष्ठ सदस्याने याविषयी माहिती दिली, “समितीने त्यांच्या मानद सदस्यत्वासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे. एजीएममध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.”
“गणपती उत्सवादरम्यान मिळणाऱ्या देणगीतून गणपती मंडळ धर्मादाय कार्य करत असते. तथापि, लॉकडाऊनच्या काळात जेव्हा निधीच्या कमतरतेमुळे धर्मादाय कार्यावर परिणाम झाला तेव्हा अंबानी आणि त्यांचे कुटुंब मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मंडळाला रिलायन्स फाऊंडेशनकडून सुमारे 24 डायलिसिस मशीन मिळाल्या आणि अनंत अंबानी यांनीही रुग्ना मदत निधी योजनेत योगदान दिले.”
दरवर्षी, “बॉलीवूड सेलेब्रिटी, राजकारणी, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता आणि आई कोकिलाबेन लालबागचा राजा हे नियमितपणे पंडालला भेट देतात. गेल्या काही वर्षांपासून अनंत अंबानी मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये लक्षणीयरित्या सहभागी झाले आहेत.”
“अंबानी कुटुंबाकडून मिळालेल्या देणग्यांमुळे मंडळाला आपले धर्मादाय उपक्रम कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू ठेवण्यास मदत झाली आहे. शिवाय, अनंत अंबानी मंडळाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यामुळे त्यांना मानद सदस्यत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तेही सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने.” असे सांगण्यात आले आहे.
मंडळाचा इतिहास
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1934 साली लालबाग बाजारपेठेत झाली. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी स्थानिक मच्छीमार आणि व्यापाऱ्यांच्या गटाने या मंडळाची स्थापना केली होती.