Gopichand Padalkar : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. सर्वच नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. अस असतानाच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे.
यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, “जातीयवादाच विद्यापीठ म्हणजे शरद पवार . सुप्रिया सुळे या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळं शिकल्या आहेत. जसा बाप तशीच लेक असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे. एकीकडे राज्यभर अजित पवार लाडकी बहीण योजनेसाठी फिरत आहेत तर सुप्रिया सुळे दुसरीकडे त्यांच्यातील किडकी बहीण दाखवत आहेत असे भाष्य पडळकरांनी यावेळी बोलताना केले आहे.
जरांगे-शिंदे यांच्याशी वैर नाही, पण देवेंद्र तुझी खैर नाही!” असे लोकांकडून बोलले जात होते यावर प्रतिक्रिया देताना पडळकर म्हणाले आहेत की, देवेंद्र फडणवीस साहेबांना केवळ ब्राम्हण आहेत म्हणून घेरल जात आहे. शरद पवार पुरोगामी मुखवटा घालून जातीवादाचे विष महाराष्ट्रात पसरवत आहेत. अशी टीका त्यांनी केली.
दारम्यान, मनोज जरांगे पाटील, एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे सर्व मराठा आहेत म्हणूनच जरांगे शिंदेंबद्दल भाष्य करायचे नाही असे सुप्रिया सुळे बोलल्या आहेत असे पडळकरांकडून सांगण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस तुम्हाला पुरुन उरले आहेत. ते कशातच सापडत नाहीत म्हणून त्यांच्या जातीवर बोलले जाते असे वक्तव्य देखील यावेळी पडळकरांनी केले आहे.