गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची सोय व्हावी, याकरिता पीएमपी प्रशासनाकडून नियोजनातील गाड्यांसह सुमारे ८०० जादा बस दोन टप्प्यात सोडण्यात येणार आहेत. ‘यात्रा स्पेशल’ म्हणून या बस धावतील. दुसऱ्या शिफ्टनंतर धावणाऱ्या या बसेसचा प्रवास मात्र पाच रुपयांनी महागणार आहे. तसेच, रात्री १२ वाजेनंतर या बसेसमध्ये कोणत्याही प्रकारचा पास चालणार नसल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पीएमपी प्रशासनाने यंदाच्या वर्षीदेखील गणेशोत्सवासाठी विशेष नियोजन केले आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागातील वाहतूक बंद झाल्यावर पर्यायी रस्त्याने वाहतूक केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ९, १० आणि १६ सप्टेंबर रोजी १६८ जादा बस धावतील. तसेच ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान ६२० जादा बस धावणार आहेत. ‘यात्रा विशेष’ बसमधून दुसऱ्या शिफ्टनंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र हा प्रवास महागात पडणार आहे. या प्रवासासाठी तिकीट शुल्कात पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रात्री १२ नंतर या बसला कोणत्याही प्रकारचा पास लागू होणार नाही.
प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने जादा बसेस मार्गावर सोडण्याचे नियोजन केले आहे. या बसला ‘यात्रा स्पेशल’चा दर्जा देण्यात आल्याने त्याच्या तिकीट दरात पाच रुपयांची वाढ केली आहे. तसेच रात्री १२ वाजेनंतर कोणताही पास चालणार नाही.