Ganesh Festival 2024 : गणपती बाप्पाचे आगमन झाले असून, सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. आज सगळ्यांनी वाजत गाजत गणपती बाप्पाचे स्वागत केले आहे. भक्त आता १० दिवस गणेशाची सेवा करून आशीर्वाद घेतील. मात्र, गणरायाचा मुक्काम संपल्यावर विसर्जनावेळी भरलेल्या डोळ्यांनी निरोप देतील.
ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात भाविक विसर्जन करतात. यावेळी अनेक जण नृत्यही करतात. यावेळी कर्तव्यावर उपस्थित असलेले पोलीसही नृत्य करतात. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलही होतात. मात्र पोलिसांचे हेच नृत्य आता इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.
कारण आता पोलिसांना नाचण्यापासून मनाई करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यामुळे पोलीसांना गणेशोत्सवादरम्यान नाचता येणार नाही.
Maharashtra | On September 6, Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar during the meeting over security and police arrangements for the Ganpati festival, warned all officers that if any policeman is found dancing in uniform, strict action will be taken against them. He said…
— ANI (@ANI) September 6, 2024
पोलीस आयुक्तांचे आदेश
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 6 सप्टेंबर रोजी सुरक्षाव्यवस्था व पोलीस दलाची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला. यावेळी मुंबईत पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान वर्दीवर नाचू नये, अशी सक्त ताकीद पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
गणेशोत्सवादरम्यान ढोल-ताशांच्या गजरात अथवा गाण्यांवर कोणताही पोलीस कर्मचारी नाचताना आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली आहे.