Ganesh Festival 2024 : महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांकडून जल्लोषात बाप्पांची मिरवणूक काढून बाप्पाचं स्वागत केलं जात आहे, दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून देशवासीयांना गणेश चतुर्थीनिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट शेअर करत लिहिले, “सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!” पंतप्रधानांनी यासोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यात ते म्हणाले की, गणेशजी विघ्नहर्ता आहेत, ते देशवासीयांच्या अडथळ्यांचा पराभव करतील. गणेशोत्सवासोबत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव येणे स्वाभाविक आहे, कारण त्यांनीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, असे यात ते म्हणत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी पुणे, मुंबईमधील गणेशोत्सवातील मिरवणुका दाखवल्या आहेत.
समस्त देशवासियों को गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। गणपति बाप्पा मोरया! pic.twitter.com/is3Jvnygju
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2024
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनथ शिंदे यांनी देखील गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, शुभेच्छा देताना ते म्हणाले, “गणरायाचे आगमन राज्याच्या विकासचक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधव, माता-भगिनी, आबाल-ज्येष्ठ यांसह प्रत्येकासाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो,” अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले.
मैं सभी देशवासियों को गणेश चतुर्थी के पावन पर्व की हार्दिक शुभकामनाएं देती हूं। देश के अनेक भागों में सामूहिक उल्लास से मनाया जाने वाला यह पर्व सामाजिक ऊर्जा का सुंदर उदाहरण प्रस्तुत करता है। हमारी परंपरा में भगवान श्री गणेश को मंगलदाता और विघ्नहर्ता माना जाता है। गणेश चतुर्थी…
— President of India (@rashtrapatibhvn) September 7, 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील केले ट्विट, “गणेश चतुर्थीच्या पवित्र सणानिमित्त मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देते. देशाच्या अनेक भागात सामूहिक उत्साहाने साजरा होणारा हा सण सामाजिक ऊर्जेचे सुंदर उदाहरण सादर करतो. आपल्या परंपरेत भगवान श्री गणेश हा शुभ आणि अडथळे दूर करणारा मानला जातो. आपल्या परंपरेत भगवान श्री गणेशाला शुभ आणि विघ्न दूर करणारे मानले जाते. गणेश चतुर्थीच्या या शुभ मुहूर्तावर, मी देवाला प्रार्थना करते, की सर्वांचे संकटांपासून रक्षण करो आणि समृद्धी देवो, गणपती बाप्पा मोरया!”