Dagdusheth Halwai Ganpati : लाडक्या बाप्पाचे आगमन आता झाले आहे. घरोघरी तसेच मंडळांमध्ये गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. दरम्यान, ढोल-ताशांच्या गजरात पुण्यात मानाच्या गणपतीबरोबरच पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे देखील थाटात आगमन झाले आहे. यावेळी बाप्पाची खास मिरवणूक काढण्यात आली.
यंदा सिंह रथामधून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. या रथाला पूर्ण फुलांनी सजवलेले होते. मिरवणुकीनंतर बाप्पाची जटोली शिव मंदिराता स्थापना झाली. यावेळी दगडूशेठ दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराचा देखावा सादर केला आहे.
https://www.instagram.com/reel/C_mfbptInkF/?utm_source=ig_web_copy_link
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे १३२ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली. आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र मंदिराची तेजस्वी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात आले आहे.
दरम्यान, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी एक कोटींचा हिरा अर्पण करण्यात आला आहे. एका भाविकाकडून हा हिरा अर्पण करण्यात आलाय. बाप्पााच्या मस्तकावर हा हिरा लावण्यात आला आहे.