राज्यात सरकारकडून विविध योजना आणल्या जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेतील दोन हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. या योजनेचे उद्दिष्ट महिलांना सक्षम बनवणे आहे. आता सरकारकडून आणि एक नवीन योजना आणली जात आहे.
सरकारकडून मुख्यमंत्री योजना दूत हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये कमवण्याची संधी तरुणांना उपलब्ध करून दिली जात आहे. योजना दूत या उपक्रमासाठी अनेक तरुण-तरुणींची निवड करण्यात येणार आहे.
या योजने अंतर्गत निवड झालेल्या तरुण आणि तरुणींना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सरकारच्या विविध योजना पोहोचवायच्या आहेत. या कामासाठी त्यांना महिन्याला दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी सरकारकडून 50 हजार योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे त्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
या योजनेसाठी 13 सप्टेंबर हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असले पाहिजेत. अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्रातील असून तो पदवीधर असला पाहिजे तसेच त्याला संगणकाचे परिपूर्ण ज्ञान असले पाहिजेत. दरम्यान अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे देखील बंधनकारक आहे.