Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग आता आई-बाबा झाले आहेत. नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. कालच दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता दीपिकाने गोड बातमी दिली असून, तिचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
माहितीसाठी दीपिका आणि रणवीर नोव्हेंबर 2018 मध्ये विवाहबद्ध झाले. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. यशस्वी कारकिर्दीदरम्यान त्यांच्या लग्नाचा निर्णय लोकांना आवडला. आता लग्नाच्या 6 वर्षानंतर दोघेही आई-बाबा झाले आहेत.
दीपिका पदुकोण गेल्या काही महिन्यांपासून तिच्या प्रेग्नेंसीचा टप्पा एन्जॉय करत होती. दरम्यान, तिने तिच्या चित्रपटांचे शूटिंगही पूर्ण केले. प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर ती ‘सिंघम अगेन’ची शूटिंग पूर्ण करताना दिसली आणि यादरम्यान तिचा बेबी बंपही पहिल्यांदाच पाहायला मिळाला. याशिवाय ती तिच्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचे बेबी बंपसोबत प्रमोशन करताना दिसली होती.
दीपिका आता आई झाल्यानंतर तिचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिका पदुकोण ‘कॉफी विथ करण’च्या सीझन 6 मध्ये आलिया भट्टसोबत दिसली होती आणि त्यादरम्यान करण जोहरने तिला एक अवघड प्रश्न विचारला होता. रॅपिड फायर राउंड दरम्यान करण जोहरचा प्रश्न होता, ‘बाळ किंवा चित्रपट यापैकी एक निवडा.’ यावर दीपिकाने दोन्ही माझ्यासाठी महत्वाचे असल्याचे बोलले होते, आता आई झाल्यानंतर तिचा हाच व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे.
काही महिन्यांपूर्वी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये ते पालक होणार असल्याचे सांगण्यात आले होते. दोघांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या चाहत्यांना ही माहिती दिली होती. आता दोघेही लवकरच त्यांच्या पुढच्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. कॉप युनिव्हर्सच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दोघेही एकत्र काम करताना दिसणार आहेत.