Baramti News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी राजकीय पक्षांनी निव़णुकांची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्ववभूमीवर अजित पवार आता ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून येते. गेल्या महिनाभपासून अजित पवार जनसन्मान यात्रेत व्यस्त आहेत, अशातच आता अजित पवारांनी एक मोठे केले आहे.
आज त्यांनी बारामतीमध्ये मेळावा घेत बारामतीकरांना काही प्रश्न विचारले आहेत, बारामती लोकसभा निवडणुकीत इतकी विकासाची कामे करूनही पराभव झाला. दुसरा आमदार मिळाला तर दोघांच्या कामाची तुलना करा. इतर कुणी आमदार मिळाला पाहिजे का ? असा सवाल त्यांनी यावेळी केला. यावरून अजित पवारांना लोकसभा निवडणुकीचा पराभव चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे दिसून येते.
पुढे बोलताना, बारामतीत वेगळी भूमिका न घेता ही माझा पराभव झाला. तुम्ही सर्वांनी आता तुमची मते सांगा, त्यावर अंतिम निर्णय मी घेणार आहे. बारामतीमधील उमेदवार ठरवताना आपल्या सर्वांची मते विचारात घेणार आहे. बारामतीचा उमेदवार ठरविताना आपली मते उपयुक्त ठरतील, असे अजित पवार यांनी बारामतीमधील मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले.
“महाराष्ट्रात पाच वर्षात एवढी कामे झाली नसेल तेवढी कामे बारामतीत झाली आहेत. एक वर्ष कोरोनात गेलं आणि एक वर्ष सत्तेत नव्हतो. नाही तर आणखी कामे झाली असती. इतकी विकासाची कामे करूनही बारामतीत हरलो. कामं करूनही पराभव झाला. दुसरा आमदार मिळाला तर दोघांच्या कामाची तुलना करा. इतर कुणी आमदार मिळाला पाहिजे का? आम्ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. अर्थसंकल्पात मी लिहिलं आहे. बारामतीत माझ्याशिवाय नेतृत्व पाहिजे का?” असा सवाल अजित पवारांनी विचारला.
“रोखठोक बोलणारा म्हणून माझी ओळख आहे. बारामती शहर असो गावं असतील आपण विकास करत आहोत. विकास कामांना प्राधान्य कसं देता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. विकास करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेताना आपण लोकांचं मत घेतो. शेवटी निर्णय मीच घेतो. पण मतं जाणून घेतलं तर निर्णय घेताना फायदा होतो. आजही मी मनिवृत्त अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचंही मत जाणून घेत असतो”, असेही पुढे अजित पवारांनी म्हटले आहे.