Paralympic 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 भारतीय मोहीम 29 पदकांसह संपली. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 भारतासाठी उत्कृष्ट ठरले. या स्पर्धेत भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला. यात भारताने एकूण 29 पदके जिंकली, ज्यात 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. याआधी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक १९ पदके जिंकण्याचा विक्रम केला होता, तो पॅरिसमधील पॅरा भारतीय खेळाडूंनी मोठ्या अभिमानाने मोडला.
पॅरालिम्पिकच्या मागील दोन आवृत्त्यांमध्ये भारताने एकूण 48 पदके जिंकली आहेत. तर याच्या आधी11 आवृत्त्यांमध्ये भारताने केवळ 12 पदके जिंकली होती. गेल्या दोन आवृत्त्यांमधून भारतीय खेळाडूंमध्ये सुधारणा आणि बदल स्पष्टपणे दिसून आला.
पॅरिसपूर्वी, 54 भारतीय खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भाग घेतला होता, जो त्यावेळी सर्वात मोठा संघ होता. त्यानंतर पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये देखील भारतीय तुकडी मोठी झाली. पॅरिसमध्ये एकूण 84 पॅरा भारतीय खेळाडूंनी भाग घेतला आणि एकाच आवृत्तीत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम करून इतिहास रचला.
टोकियो पॅरालिम्पिकपूर्वी भारताने केवळ 4 सुवर्णपदके जिंकली होती. आता फक्त पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने 7 सुवर्ण जिंकले आहेत आणि याआधी टोकियोमध्ये भारताच्या खात्यात 5 सुवर्ण जिंकले होते.
पॅरिस पॅरालिम्पिकमधील सर्व 29 भारतीय खेळाडू
अवनी लेखरा : शूटिंग : महिलांची 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 : गोल्ड मेडल
मोना अग्रवाल : शूटिंग : महिलांची 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 : कांस्यपदक
प्रीती पाल : ऍथलेटिक्स : महिलांची 100 मी T35 : कांस्यपदक
मनीष नरवाल : शूटिंग : पुरुषांची 10 मीटर एअर पिस्तूल SH1 : सिल्वर मेडल
रुबिना फ्रान्सिस : शूटिंग : महिला 10 मीटर एअर पिस्तूल SH1 : कांस्यपदक
प्रीती पाल : ऍथलेटिक्स : महिला 200मी T35 : कांस्यपदक
निषाद कुमार : ऍथलेटिक्स : पुरुषांची उंच उडी T47 : सिल्वर मेडल
योगेश कथुनिया : ऍथलेटिक्स : पुरुषांची डिस्कस थ्रो F56 : सिल्वर मेडल
नितेश कुमार : बॅडमिंटन : पुरुष एकेरी SL3 : गोल्ड मेडल
तुलसीमथी मुरुगेसन : बॅडमिंटन : महिला एकेरी SU5 : सिल्वर मेडल
मनीषा रामदास : बॅडमिंटन : महिला एकेरी SU5 : कांस्यपदक
सुहास यथीराज : बॅडमिंटन : पुरुष एकेरी SL4 : सिल्वर मेडल
राकेश कुमार / शीतल देवी : धनुर्विद्या : मिश्र संघ कंपाऊंड ओपन : कांस्यपदक
सुमित अंतिल : ऍथलेटिक्स : पुरुष भालाफेक F64 : गोल्ड मेडल
नित्य श्रीशिवन : बॅडमिंटन : महिला एकेरी SH6 : कांस्यपदक
दीप्ती जीवनजी : ऍथलेटिक्स : महिलांची 400 मीटर T20 : कांस्यपदक
मरियप्पन थांगावेलू : ऍथलेटिक्स : पुरुषांची उंच उडी T63 : कांस्यपदक
शरद कुमार : ऍथलेटिक्स : पुरुषांची उंच उडी T63 : सिल्वर मेडल
अजित सिंग : ऍथलेटिक्स : पुरुष भालाफेक F46 : सिल्वर मेडल
सुंदरसिंग गुर्जर : ऍथलेटिक्स : पुरुष भालाफेक F46 : कांस्यपदक
सचिन खिलारी : ऍथलेटिक्स : पुरुषांचा शॉट पुट F46 : सिल्वर मेडल
हरविंदर सिंग : धनुर्विद्या : पुरुषांची वैयक्तिक रिकर्व खुली : गोल्ड मेडल
धरमबीर : ऍथलेटिक्स : पुरुष क्लब थ्रो F51 : गोल्ड मेडल
प्रणव सुरमा : ऍथलेटिक्स : पुरुष क्लब थ्रो F51 : सिल्वर मेडल
कपिल परमार : ज्युडो : पुरुष ६० किलो J1 : कांस्यपदक
प्रवीण कुमार : ऍथलेटिक्स : पुरुषांची उंच उडी T64 : गोल्ड मेडल
होकाटो होतोझे सेमा : ऍथलेटिक्स : पुरुषांचा शॉट पुट F57 : कांस्यपदक
सिमरन : ऍथलेटिक्स : महिला 200मी T12 : कांस्यपदक
नवदीप सिंग : ऍथलेटिक्स : पुरुष भालाफेक F41 : गोल्ड मेडल