मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर राज्यभर संतापाची एकच लाट उसळली होती. त्यावेळी महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना जोडे मोरो आंदोलन केलं होत. या विषयावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आ आजवर ज्या काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला त्यांनी आम्हाला महाराजांविषयी आदर शिकवू नये, तसेच बापाला लुटारू म्हणणारी ही काँग्रेसची टोळी आजवर खोटा इतिहास सांगत आली. महाराजांनी सुरतेची लूट केली नव्हती तर स्वराज्याचा खजिना ताब्यात घेतला होता अशी प्रतिक्रिया दिली होती.
याविषयावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे इतिहाचे अभ्यासक, संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले की, फडणवीस बोलले ते योग्यच बोलले कारण, मोगलांचा खजिना हा सुरतेला होता आणि महाराजांनी तो ताब्यात घेतला त्यावेळी कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला महाराजांनी इजा केली नाही किंवा त्यांच्याकडून संपत्ती ताब्यात घेतली नाही, त्यांनी फक्त स्वराज्याकडून लुटलेली संपत्ती ताब्यात घेतली आणि ते महाराष्ट्रात परत आले. त्यामुळे फडणवीस जे बोलले ते योग्यचं आहे, असे माझे ठाम मत आहे.
दरम्यान, फडणवीसांच्या विधानावर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती, त्याला अखेर डॉ. मोरेंसारख्या अभ्यासकाकडून अधिकृत मान्यता मिळाल्यावर हा वाद शांत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.