Amit Shah Visit Lalbag Raja : सध्या महाराष्ट्रभर गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. मुंबईत देखील आता प्रसिद्ध लाल बाग राजाच्या दर्शनासाठी दिल्लीहून नेतेमंडळी येत आहेत. दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पत्नीसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारही उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे दोन दिवशीय मुंबई दौऱ्यावर आहेत. रविवारी ते मुंबईत दाखल झाले असून, काल उशिरा रात्री त्यांच्या उपस्थितीत महायुतीची महत्वाची बैठक पार पडली. तर आज सोमवारी ९ सप्टेंबर रोजी त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
अमित शाह साधारण सकाळी ११.५५ च्या दरम्यान लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आले. यावेळी त्यांनी गणरायांच्या मूर्तीला हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी बाप्पााला नारळाचे तोरण अर्पण केले. त्यानंतर बाप्पााच्या चरणावर डोकं ठेवत आशीर्वाद मागितला.
लालबाग मध्ये दाखल होण्यापूर्वी अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट दिली आणि बाप्पाचे दर्शन घेतले. त्यासोबत शाहांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील निवासस्थानी असलेल्या गणपतीचे दर्शन घेतले.