राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात या निवडणूका पार पाडल्या जाणार आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. यासंदर्भात अनेक ओपनियन पोल समोर येत आहेत .
अस असतानाच आता ओपनियन पोलनुसार विधानसभेत 26-31 जागा ठाकरे गट जिंकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर शिंदेंचा शिवसेना गट विधानसभेत 42-52 जागा जिंकण्याचा अंदाज बांधला जात आहे. शिंदेंना 6.8 टक्के वोट शेअर मिळतील अशी शक्यता ओपनियन पोलनुसार वर्तवली जात आहे. यामुळेच आता ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मिळण्याचे चिन्ह दिसून येत आहेत.
राज्यात भाजपला 26.2 टक्के वोट शेअर मिळून 83 ते 93 जागा मिळू शकतात. तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना 6.8 टक्के वोट शेअरसोबत 42-52 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2.8 टक्के वोट शेअर मिळून 07-12 जागा भेटतील असा अंदाज ओपनियन पोलनुसार बांधला जात आहे.
काँग्रेस 16.2 टक्के वोट शेअर मिळवून 58-68 जागा जिंकू शकते तर ठाकरेंची शिवसेना 14.2 टक्के वोट शेअरसह 26-31 जिंकण्याची शक्यता आहे. याचसोबत शरद पवारांची राष्ट्रवादी 10.1 टक्के वोट शेअरसह 03-08 जागा जिंकण्याचा अंदाज ओपनियन पोलनुसार बांधला जात आहे. राज्याच्या विधानसभेच्या 288 जागा असून बहुमतासाठी 145 जागा मिळणे आवश्यक आहे.
दरम्यान, ओपिनियन पोलने दिलेल्या अंदाजानुसार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 129-144 जागा तर महायुतीला 137-152 अशा जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.