Kumar Vishwas : प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या मॅनेजरच्या मोबाईलवर कॉल करून आरोपीने कुमार विश्वास यांना रामाची स्तुती करणे थांबवण्यास सांगितले आहे.
यासंबंधित मॅनेजरने तात्काळ गाझियाबादच्या इंदिरापुरम पोलिसांना माहिती दिली आणि या प्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 351 (4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा आता तपास सुरू असून, लवकरच याच्यामागे कोण आहे समोर येईल.
सध्या कवी कुमार विश्वास सिंगापूरमध्ये आहेत आणि तिथे ते रामकथा करत आहेत. मॅनेजरकडून माहिती मिळाल्यानंतर कुमार विश्वास यांनी देखील आपल्या X वर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “जैसे इन जैसे खर-दूषणों के धमकाने से देश “राघवेंद्र राम का गुणगान” सुनना बंद कर देगा…..और हम करना…. “सीताराम चरित अति पावन। मधुर सरस अरु अति मनभावन॥ पुनि पुनि कितनेहू सुनत सुनाये। हिय की प्यास बुझत न बुझाए॥”
जैसे इन जैसे खर-दूषणों के धमकाने से देश “राघवेंद्र राम का गुणगान” सुनना बंद कर देगा और हम करना 😃👎
“सीताराम चरित अति पावन।
मधुर सरस अरु अति मनभावन॥
पुनि पुनि कितनेहू सुनत सुनाये।
हिय की प्यास बुझत न बुझाए॥” 🥰🙏 https://t.co/SgkFGOipEz— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) September 8, 2024
कवी कुमार विश्वासचे व्यवस्थापक प्रवीण पांडे यांनी पोलिस तक्रारीत सांगितले की, “7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 06:02 वाजता माझ्या फोनवर एक अनोळखी नंबर वरून कॉल आला. यावेळी फोन करणाऱ्याने अपशब्द वापरत थेट डॉ.विश्वास यांना धमकी दिली. या आता कुमार यांच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे. कॉल करणाऱ्या व्यक्तीने अपमानास्पद भाषा वापरली आणि विशिष्ट धमक्या दिल्या ज्या अत्यंत चिंताजनक आहेत.”
पोलिसांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की हा कॉल मुंबईतून आला असून तो कोणत्याही ॲपवरून नसून सामान्य कॉल आहे. सध्या पोलीस त्याच्या तपासात गुंतले असून फोन करणारा कोण आहे आणि त्याचा हेतू काय होता याचा शोध घेत आहेत. लवकरच त्याचा शोध लागेल, अशी आशा आहे.
कुमार विश्वास हे प्रदीर्घ काळापासून देश-विदेशात रामकथा करत आहेत आणि खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या रामकथेला हजारो लोक जमतात. त्यामुळे अनेकजण त्यांच्या विरोधात बोलू लागले आहेत. अशा स्थितीत धमकी मिळणे ही चिंतेची बाब आहे.