यंदा ७ ऑगस्ट रोजी राज्यात मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाच स्वागत झाले आहे. गणेशाच्या आगमनाने सर्वत्र आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी मुंबई पुणे या ठिकाणी गणेशोत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची समस्या सामान्य आहे. हीच बाब लक्षात घेऊन दरवर्षी प्रशासनाकडून अनेक नियम आणि अटी लागू केल्या जातात. यावर्षी देखील प्रशासनाकडून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये याची खबरदारी घेणारे नियम लागू केले आहेत.
गणेशोत्सव काळात 7 ते 12 सप्टेंबर रोजी रात्री 10 पर्यंत लाऊडस्पीकर वाजवता येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. 13 ते 17 पर्यंत म्हणजे पाच दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर सुरु ठेवण्यास परवानगी असेल तसेच लेझर लाईटवर बंदी असणार आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे.
याचसोबत 7,16 आणि 17 सप्टेंबरला पुणे शहरात दारू बंदी असणार आहे. गणेशोत्सव काळात सात हजार पोलिसांचा शहरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 756 आरोपीना प्रतिबंधात्मक नोटीसा या काळात वाजवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, 3798 सार्वजनिक गणेश मंडळे यावर्षी शहरात असून कोणी सोशल मीडियावर काही आपत्तीजन्य पोस्ट टाकल्यास कारवाई केली जाणार असल्याचे देखील पोलिसांनी यावेळी सांगितले.