अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांच्या अडचणी आता काही प्रमाणात कमी झालेल्या दिसत आहेत कारण आता सेन्सॉर बोर्डाकडून कंगना रणौतच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाला दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून कंगना रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटाला U/A सर्टिफिकेट दिले नव्हते आता त्यांच्या चित्रपटाला U/A सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे. हा चित्रपट आधी 6 सप्टेंबरल प्रदर्शित होणार होता परंतु U/A सर्टिफिकेट नसल्यामुळे हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. मात्र आता U/A सर्टिफिकेट मिळाल्याने चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रवेश करेल.
काही शीख संघटनांनी चित्रपटातील काही सीन्सवर आक्षेप घेऊन तक्रार केली होती. तसेच चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी त्यांच्याकडून होत होती. हे प्रकरण कोर्टात जाऊन पोहचले यानंतर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र थांबलं यामुळेच इमर्जन्सी चित्रपट वेळेत प्रदर्शित होऊ शकला नाही. आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी दिली असून, त्यात योग्य ते बदल करण्यास सांगण्यात आले आहेत.
दरम्यान, इमर्जन्सी या चित्रपटात कंगणा रणौत माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील कंगणा रणौत हिने केलेले आहे. या चित्रपटामध्ये श्रेयश तळपदे, अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, सतीश कौशिक यांनी महत्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.
झी स्टुडिओच्या सहकार्याने प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स बॅनरखाली कंगणा रणौतने हा चिटपट बनवला आहे.