भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकन उपाध्यक्ष आहेत. यावेळी त्या डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवणूक लढणार आहेत. अमेरिकन निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे मत तयार झालेले आहे. अशातच कमला हॅरिसच्या टीमने दक्षिण आशियाई समुदायाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक अनोखा मार्ग शोधून काढला आहे. सध्या सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यामध्ये ‘नाटू नाटू’ या बॉलीवूड गाण्यावरून एक नवीन गाणे तयार करण्यात आलेले आहे. जे सध्या त्यांच्या प्रचार रॅलीत वाजवण्यात येत आहेत. कमला हॅरिस यांनी मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, विस्कॉन्सिन, जॉर्जिया, नेवाडा आणि ऍरिझोना यांसारख्या राज्यांतील सुमारे 50 लाख दक्षिण आशियाई मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा तोडगा काढण्यात आला आहे. ‘RRR’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘नाटू नाटू ‘वर आधारित ‘नाचो नाचो’ हे गाणे तयार करण्यात आले आहे.
कमला हॅरिसला याना आशियाई मतदारांचा पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशाने हे गाणे बनवण्यात आलेले आहे. अजय भुटोरिया यांनी हे गाणे लाँच केलेले आहे. कमला हॅरिस यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय वित्त समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचे भुटोरिया हे सदस्य आहेत. ‘नाचो नाचो’ हे गाणे शिबानी कश्यपने गायलेले आहे. तसेच रितेश पारिख यांनी या गाण्याला संगीत दिलेले आहे. 1.5 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये कमला हॅरिस यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे क्षण दाखवण्यात आलेले आहेत.
दरम्यान, तेलगू, तमिळ, गुजराती, पंजाबी आणि हिंदी अशा विविध भाषांमध्ये वेगवेगळे संदेशही देण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.