Ajit Pawar : गेले दोन दिवस गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे मुंबई दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी महायुतीची बैठक घेत अनेक मुद्दे स्पष्ट केले, अमित शहांच्या मुंबई दौऱ्यांनंतर चर्चा होतीये ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची (Ajit Pawar). सोमवारी गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीला रवाना होण्याआधी मुंबई विमानतळावर एक बैठक घेतली जिथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या देखील उपस्थित होते.
विमानतळावर अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेत अजित पवार यांनी शहांकडे ‘बिहार पॅटर्न’प्रमाणे महाराष्ट्रातही मुख्यमंत्रिपद ठरवा, असा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त आले होते. यावरच आता अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
याविषयी बोलताना ते म्हणाले, “गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
या सर्व वृतांना फेटाळत अजित पवार यांनी राजकीय चर्चांना रोख लावला. पत्रकारांशी बोलताना अजितदादा म्हणाले, “मुख्यमंत्रिदाबाबत अमित शाह यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. राज्यात कापूस, सोयाबीन, कांदा निर्यातबंदी, ‘एमएसपी’चा दर आणि अन्य काही गोष्टींबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा केली.” असं अजित पवार यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, विधानसभेच्या जागावाटपाबद्द महायुतीमध्ये विविध चर्चा सुरु आहेत. अशातच आता काल झालेल्या बैठकीत महायुतीत जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय झाल्याचे बोललं जात आहे. यात भाजप 288 पैकी जवळपास 150 जागा लढवू शकते. तर अजित पवार गटाला 70 जागा मिळू शकतात.