Thane : ठाणे येथील घोडबंदर रोडवर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढताना दिसत आहे, अशातच अपघातांच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दरम्यान आज सकाळच्या वेळी ठाणे घोडबंदर (Ghodbunder Road) मार्गावरील ओवळा सिग्नलजवळ एसटी बस (ST Bus) मेट्रोच्या पिलरला धडकल्याची घटना घडली.
या अपघातात 11 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर सध्या ऑस्कर आणि टायटन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
११ प्रवासी जखमी
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर हा अपघात सकाळच्या सुमारात झाला. या रोडवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसने मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक दिली. या अपघातात 11 प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अपघातातील जखमींवर उपचार सुरु
या घटनेत जगमी झालेल्या रुग्णांवर सध्या ऑस्कर आणि टायटन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल, वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर या बस मधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले, आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, त्यानांतर त्या ठिकाणावरील बस बाजूला काढण्यात आली, सकाळी झालेल्या या अपघाताने घोडबंदर रोडवरील वाहतुकीवर देखील परिणाम झाला.