US Presidential Elections 2024 : अमेरिकन निवडणुकांना फक्त आठ आठवडे उरले आहेत. अशातच बुधवारी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्यात पहिली डिबेट (Presidential Debate) पार पडली. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने कमला हॅरिस या शर्यतीत सामील झाल्या, कमला यांनी या निडणुकीत पाऊल ठेवताच अमेरिकेच्या निवडणुका रंजक बनल्या आहेत.
आजच्या डिबेटपूर्वी अनेक पोलमध्ये दोन्ही उमेदवार एकमेकांना कडवी टक्कर देताना दिसले, या डिबेटमध्ये कधी ट्रम्प तर कधी हॅरिस एकमेकांवर वर्चस्व गाजवताना दिसले. यामध्ये कोणत्या-कोणत्या विषयांवर चर्चा झाली पाहूया…
डिबेट मध्ये पहिले ट्रम्प यांचे वर्चस्व
अपेक्षेप्रमाणे, डोनाल्ड ट्रम्प चर्चेदरम्यान हॅरिस यांच्यावर वैयक्तिक हल्ले करताना दिसले. अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हॅरिस आणि त्यांच्या वडिलांना मार्क्सवादी म्हंटले आहे.
ट्रम्प म्हणाले, ‘तीन-चार वर्षांपूर्वी त्या जे मानत होत्या ते आता संपले आहे, आणि आता त्या माझ्या तत्वज्ञानाकडे जात आहे. त्या एक मार्क्सवादी हे सर्वांना माहीत आहे. त्यांचे वडील अर्थशास्त्राचे मार्क्सवादी प्राध्यापक आहेत. त्यांनी हॅरिसला चांगले शिक्षण दिले आहे. ट्रम्प यांच्या कमेंट दरम्यान कमला हॅरिस हसताना दिसल्या.
पुढे त्यांनी जो बायडेन प्रशासनाच्या कृतींबाबतही हॅरिस यांच्यावर लक्ष केले. यावेळी ट्रम्प म्हणाले की, ‘बायडेन प्रशासनाच्या काळात अमेरिकेतील गुन्हेगारी विक्रमी पातळीवर वाढली आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर कमला हॅरिस यांनी त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला केला आणि म्हटले की, ‘ज्या व्यक्तीवर आधीच गुन्हेगारी आरोप आहेत अशा व्यक्तीकडून अशा प्रकारच्या टिप्पण्या चांगल्या वाटत नाहीत.’
ज्याच्या प्रत्युत्तरात ट्रम्प यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आणि आपल्यावरील हे सर्व खटले राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले.
या डिबेटमध्ये ट्रम्प यांनी 13 जुलै रोजी आपल्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाला जबाबदार धरले. यावेळी ते म्हणाले, ‘कदाचित त्यांनी (डेमोक्रॅट्स) माझ्याबद्दल जे काही बोलले त्यामुळे माझ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.’
अमेरिकेत गर्भपाताच्या अधिकारावरूनही हॅरिस-ट्रम्प यांच्यात वाद
या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान दोन्ही उमेदवार जोरदार भिडले. जिथे ट्रम्प गर्भपाताच्या धोरणाचा बचाव करताना दिसले. त्याचवेळी कमला हॅरिसने याला महिलांचा अधिकार म्हटले आणि त्याबाबत वकिली करताना दिसल्या. यावेळी त्या म्हणल्या, ट्रम्प यांनी महिलांनी त्यांच्या शरीराचे काय करावे हे सांगू नये.
यावेळी हॅरिस यांनी ट्रम्प यांना कोंडीत पकडले आणि सांगितले की, ‘जर ट्रम्प निवडणूक जिंकले तर ते संपूर्ण देशात गर्भपातावर बंदी घालणारे विधेयक मंजूर करतील. शरीराशी संबंधित निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याबाबत सरकारने नियम बनवू नयेत, असे यावेळी त्या म्हणल्या.
स्थलांतरितांच्या मुद्द्यावर ट्रम्प यांचे बेताल दावे आणि हॅरिस यांचा पलटवार
ट्रम्प यांनी चर्चेदरम्यान सांगितले की, ‘बायडेन प्रशासनाच्या काळात अमेरिकेत स्थलांतरितांची संख्या विक्रमी पातळीवर वाढली आहे. ओहायोमध्ये हैतीयन स्थलांतरित मोठ्या संख्येने राहत असून ते तेथील अमेरिकन लोकांचे पाळीव प्राणी खात असल्याचा दावा त्यांनी केला.
ट्रम्प म्हणाले, ‘मी टीव्हीवर लोकांना असे म्हणताना ऐकले की श्वान चोरले गेले आणि खाल्ले गेले.’
तथापि, स्थलांतरितांनी पाळीव प्राण्यांचे मांस खाल्ल्याचा कोणताही पुरावा न मिळाल्याने ट्रम्प यांचा दावा आधीच फेटाळण्यात आला आहे.
स्थलांतरितांच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्या टिप्पणीला उत्तर देताना कमला हॅरिस म्हणाल्या की, “स्थलांतरितांबाबत आणलेले विधेयक ट्रम्प यांनी लॉबीच्या माध्यमातून थांबवले. हॅरिस म्हणल्या की, ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक फायद्यासाठी हे विधेयक मंजूर होऊ दिले नाही. ते म्हणाले, ‘एखादी अडचण दूर करण्याऐवजी तो मुद्दा बनवून निवडणूक लढवणे त्यांनी पसंत केले.’
हॅरिस यांनी चर्चेदरम्यान सांगितले की, “जर त्या यावेळी जिंकल्या तर तिची प्राथमिकता द्विविभाजन सीमा विधेयक मंजूर करणे असेल. या विधेयकामुळे बेकायदेशीरपणे अमेरिकेत स्थलांतरितांच्या प्रवेशावर निर्बंध येणार आहेत.
दरम्यान, एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्यावर निशाणा साधला आणि म्हटले की, “डेमोक्रॅट्सनी त्यांना श्वानाप्रमाणे निवडणूक प्रचारातून बाहेर काढले.” यावर हॅरिस उत्तर देताना म्हंटल्या, ‘तुम्ही माझ्याविरुद्ध डिबेट करत आहात, जो बिडेनविरुद्ध नाही.’
इस्रायल-गाझा युद्ध आणि रशिया-युक्रेन युद्ध
चर्चेदरम्यान ट्रम्प इस्रायल-गाझा युद्ध आणि रशिया-युक्रेन युद्धावर कमला हॅरिस आणि त्यांच्या सरकारची कोंडी करताना दिसले. ते म्हणाले की, ‘ते राष्ट्राध्यक्ष असते तर इस्रायलवर हल्ला झाला नसता. हॅरिस आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे युद्ध थांबवण्यात अपयशी ठरले आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
हॅरिस यांनी प्रत्युत्तर देताना म्हंटले, ‘ट्रम्प यांना विश्वास आहे की ते युक्रेनमधील युद्ध लवकर संपवतील. तर नाही ते युक्रेन व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवतील.
हॅरिस म्हणाल्या, ‘जर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असते तर पुतीन सध्या (युक्रेनची राजधानी) कीवमध्ये बसले असते. आम्ही अमेरिकन असे नाही. पुतीन हा हुकूमशहा आहे जो तुम्हालाही सोडणार नाही.
इस्रायल-हमास युद्धावर हॅरिस यांची कोंडी
कमला हॅरिस इस्रायलचा द्वेष करतात, असे ट्रम्प म्हणाले आहेत. ‘मी हे शक्य तितक्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि मी राष्ट्राध्यक्ष झालो तर रशिया-युक्रेन युद्ध लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेन. राष्ट्रपती होण्यापूर्वीही मी हे करेन.
प्रत्युत्तरात हॅरिस म्हणाले, ‘आम्हाला फक्त एकच गोष्ट माहित आहे आणि ती म्हणजे हे युद्ध संपले पाहिजे आणि ते त्वरित संपले पाहिजे. आम्ही या दिशेने काम करत राहू.’
कमला हॅरिसच्या भारतीय वंशावर ट्रम्प त्यांची टिप्पणी
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही कमला हॅरिस या कृष्णवर्णीय आणि भारतीय वंशाच्या असल्याने निशाणा साधला आहे. हॅरिस लोकांनुसार त्यांचा रंग बदलतात आणि कधी त्या कृष्णवर्णीय बनतात तर कधी भारतीय वंशाची असतात. ट्रम्प यांनी कमला यांच्या नावाची देखील अनेकदा खिल्ली उडवली आहे.
मात्र या चर्चेदरम्यान ते हॅरिसवर अशा प्रकारची टिप्पणी टाळताना दिसले. ते म्हणाले, “त्या काय आहेत याची मला पर्वा नाही. आणि त्यांना जे व्हायचे त्यांची त्यात मला काहीच अडचण नाही.”
Presidential Debate म्हणजे काय?
निवडणुकीच्या वेळी निवडणूक लढवणाऱ्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकाच मंचावर समोरासमोर उभे राहून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली तर त्या नेत्यांच्या मतांची आणि विचारांची स्पष्ट कल्पना येते. याला प्रेसिडेंशियल डिबेट म्हणतात.
या वादविवाद स्पर्धेचा नियम काय?
या चर्चेच्या नियमांनुसार दोन्ही नेत्यांचे भाषण अगोदर लिहिलेले नसते, आगाऊ तयार केलेले आणि लिहिलेले काहीही येथे आणता येत नाही. दोघांकडे डायरी आणि पेन असेल. याशिवाय त्यांना काहीही दिले जात नाही.