बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malika Arora ) हिला मोठा धक्का देणारी घटना घडली आहे. मलायका अरोराच्या वडीलांनी राहत्या घरी म्हणजेच आलमेडा पार्क या इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचे जीवन संपवले आहे. मलायका अरोराच्या वडीलांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरून गेले आहे. अनिल अरोरा यांच्या आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नसून पोलिस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.
अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्यानंतर मलायकाचा घटस्फोटीत पती अरबाज खान कुटुंबियांसोबत घटनास्थळी पोहचला होता. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 9 वाजता घडलेली आहे. ही घटना घडली त्यावेळी अभिनेत्री मलायका अरोरा पुण्यामध्ये होती. या घटनेची माहिती मिळताच ती मुंबईकडे रवाना झाली.
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे मर्चंट नेव्हीमध्ये कामाला होते. त्यांची निवृत्ती नुकतीच झाली होती. निवृतीनंतर ते मुंबई मधील वांद्रे येथे राहत होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते गेल्या वर्षी वैद्यकीय समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते परंतु त्यांना नक्की काय आजार झाला होता याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.तसेच त्यांच्या आत्महत्येच्या वेळी त्यांच्या पत्नी घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अनिल अरोरा यांच्या आत्महत्येचं कारण नेमकं काय ? हे देखील अद्याप समोर आलेले नाही.सध्या फॉरेन्सिक टीम घराचे नमुने घेऊन आत्महत्या केल्याचे ठिकाण तपास करत आहे. तसेच वांद्रे पोलिसांनी घरातील सदस्यांची चौकशी केली असून इमारतीचे सुरक्षा रक्षकाचीही चौकशी केली.