विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा ( Bhupendra Singh Hudda ) यांनी मोठे विधान केले आहे.भूपेंद्र सिंह हुड्डा आज गढी सांपला किलोई मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मी जनसेवेसाठी राजकारणात आलो आहे असे वक्तव्य भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी केलेले आहे. तसेच आम आदमी पार्टी (आप) सोबत युती करण्याचे प्रयत्न केले परंतु कदाचित त्यांना एकत्र निवडणूक लढवायची नव्हती आणि म्हणूनच आप ने आपले उमेदवार जाहीर केले आहेत असा दावा भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी केला आहे.
याचसोबत पुढे बोलताना भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणालेले आहेत की, हरियाणातील जनतेने काँग्रेस सरकारला मत देण्याचे मन बनवले आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजप जाऊन कॉँग्रेस येणार आहे. तसेच या ठिकाणी लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. तसेच या पुढे बोलताना, ज्यांनी मते कमी केली त्यांनी गेल्या वेळी भाजपसोबत सरकार स्थापन केले असा टोला दुष्यंत चौटाला यांच्या पक्ष जेजेपीवर भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी लगावलेला आहे.
दरम्यान, भाजपने मंजू हुडा यांना गढी सांपला किलोई जागेसाठी उमेदवारी दिली आहे. तसेच या ठिकाणी प्रवीण घुसकानी यांना आम आदमी पक्षाने (आप) तिकीट दिले आहे.भूपेंद्र सिंह हुड्डा यांचा गढी सांपला किलोई मतदार संघ हा बालेकिल्ला आहे. 2000 पासून ते सातत्याने या ठिकाणी निवडून येत आहेत. या मतदार संघात त्यांना एकदाच निवडून येण्यात उपयश आले होते.
दरम्यान, हरियाणातील सर्व 90 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. हे मतदान 5 ऑक्टोबर रोजी पार पाडले जाणार आहे तर याचा निकाल 8 ऑक्टोबर रोजी लागणार आहे.