Pune Ganpati Decoration 2024 : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणरायाचे अगदी थाटात आगमन झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्राने बाप्पाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. खासकरून पुण्यात (Pune Ganpati Decoration 2024) तो जोश पुन्हा पहायला मिळाला. नेहमी प्रमाणे यावर्षी देखील पुण्यातील अनेक प्रतिष्ठित मंडळांनी अप्रतिम असे देखावे सादर केले आहेत, यावेळी पुण्यात एका-पेक्षा एक देखावे पाहायला मिळत आहेत. अशाच देखाव्यांपैकी आज आम्ही तुम्हाला पुण्यातील एका प्रसिद्ध देखाव्याबद्दल माहिती देणार आहोत, ज्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
तो देखावा साकारणार मंडळ आहे पुण्यातील शनिपार मंडळ. या शनिपार मंडळाने यावर्षी अक्षरशः वृदावनचं पुण्यात आणले आहे, यावर्षी शनिपार मंडळाने वृंदावनाचा हुबेहूब देखावा साकारला आहे. हा देखावा शनिपार चौक, सदाशिव पेठ येथे आहे. या देखाव्यात सर्वत्र रंगीबेरंगी फुले, राधा-राणीचा झोपाळा, बाळकृष्ण पाहायला मिळतायेत. या देखाव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील खुप व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/C_uOWyGI4Mm/?utm_source=ig_web_copy_link
बाप्पाच्या आगमनाला आता ५ दिवस होऊन गेले आहेत. घरच्या बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर नागरिक आता गणपती पाहायला मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहेत, अशातच शनिपार मंडळाचा हा डोळ्यांना आनंद देणारा देखावा पाहण्यासाठी सकाळपासूनच लोकांची गर्दी येथे पाहायला मिळत आहे. या देखाव्यामध्ये कृष्णाची संपूर्ण कथा सांगण्यात आली आहे.