भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड Dhananjaya Yeshwant Chandrachud) यांच्या घरी गणपती पूजन समारंभाला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi ) यांनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रचूड यांच्या घरी पोहचल्यावर चंद्रचूड आणि त्यांची पत्नी कल्पना दास यांनी मोदींचे उत्साहात स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड आणि त्यांची पत्नी कल्पना दास यांच्यासोबत गणपतीची आरती देखील केली आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोक्यावर टोपी आणि सोनेरी धोती-कुर्ता असा मराठमोळा पोशाख परिधान केला होता.यावेळी चंद्रचूड यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते.
पंतप्रधानांनीही या भेटीदरम्यानचा एक फोटो आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन शेअर केला आहे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेश पूजेला उपस्थित होतो असे त्यांनी सांगितलेले आहे. याचसोबत भगवान श्रीगणेश आम्हाला आणि तुम्हा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो असा मजकूर त्यांनी खास मराठीमध्ये लिहिलेला दिसून येत आहे.
सध्या सोशल मिडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपतीची आरती करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, मोदींनी गणेश चतुर्थीच्या दिवशीही ‘गणपती बाप्पा मोरया’ असं म्हणत एक व्हिडीओ शेअर करत सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या होत्या. यासोबतच दया आणि बंधुभावाची भावना सदैव कायम राहावी असा संदेश देखील त्यांनी दिलेला आहे.