आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या हस्ते मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंकला जोडणाऱ्या कनेक्टरचे उद्धाटन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे आता अवघ्या 12 मिनिटांत मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर पार पडणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसेच वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधला आहे. 6.25 किमीचा मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंतचा मार्ग देखील सुरू केला आहे तसेच हा मार्ग पुढे वाढवण्यात आला असून याला 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडला आहे.
या प्रकल्पाच्या उद्धाटन कार्यक्रमावेळी एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले. तसेच खड्डे मुक्त रस्ते होणार असल्याची घोषणा देखी केली. यावेळी ते म्हणाले, अवघ्या दहा मिनिटात मुंबईकरांना मरीन ड्राईव्ह ते बांद्रापर्यंतचे अंतर आता पार करता येणार आहे कारण आपण कोस्टल हायवे सिलिंकलाही जोडला आहे. यामुळे प्रदूषण देखील कमी होणार असून लोकांचा वेळ सुद्धा वाचणार आहे. मुंबईकरांसाठी हा गेम चेंजर प्रकल्प ठरणार असल्याचे वक्तव्य त्यांनी यावेळी केली.
महायुतीचे सरकार आल्यानंतर आम्ही मुंबईवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. या ब्रीजवरून पाहिलं तर विदेशात आल्यासारख लोकांना वाटेल असे भाष्य देखील त्यांनी यावेळी बोलताना केले आहे.