दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामीनास मंजूरी दिलेली आहे. आज या संदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. १० लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यात आला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने हा जामीनाचा निर्णय दिला आहे.
5 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीनाबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने १७७ दिवसांनंतर अखेर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. केजरीवाल यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी सीबीआयच्या अटकेला आव्हान दिले होते. यापूर्वीच त्यांना ईडीच्या खटल्यात जामीन मिळाला आहे
दरम्यान, मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात २१ मार्च रोजी केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. अटक करण्यापूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांना ९ वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते परंतु केजरीवाल चौकशीसाठी तपास यंत्रणेसमोर हजर राहत नव्हते यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. २२ मार्च रोजी त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर ११ दिवसांच्या कस्टडीत ठेवण्यात आले यानंतर संपूर्ण चौकशी केल्यानंतर तिहार तुरुंगात त्यांची रवानगी केली होती.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने १७७ दिवसांनंतर अरविंद केजरीवाल यांचा जामीन मंजूर केल्याने अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासाच मिळालेला आहे.