Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या दुसऱ्या गोळीबारानंतर उद्योगपती इलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी चिंता व्यक्त करताना लिहिले, ‘कमला हॅरिस आणि जो बायडेन यांच्यावर आतापर्यंत एकही हल्ला झालेला नाही.’ इलॉन मस्कच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे, या पोस्टवर आता वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत, काही मस्कवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत तर काही जण समर्थन देत आहेत.
इलॉन मस्कच्या ट्विटवर एका वापकर्त्याने लिहिले, “ट्रम्प यांना का मारायचे आहे? तर दुसऱ्या युजरने इलॉन मस्कवर निशाणा साधला आणि म्हंटले, “काहीही पोस्ट करण्यापूर्वी तुम्ही विचार करता का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “बायडेनच्या काळात ट्रम्प यांच्याविरोधात अनेक घटना घडल्या आहेत, त्यांच्यावर बंदी का घातली जात नाही. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनीही ट्विट केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या एक्स हँडलवर लिहिले की, “या घटनेनंतर कोणतीही अफवा पसरण्यापूर्वी, ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी पूर्णपणे सुरक्षित आहे.’ या मुद्द्यावर व्हाईट हाऊसकडून देखील एक निवेदन जारी करण्यात आले आहे. व्हाईट हाऊसने सांगितले की, ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती बायडेन आणि कमला याना देण्यात आली आहे. ट्रम्प सुरक्षित असल्याच्या वृत्तावर राष्ट्राध्यक्षांनी आनंद व्यक्त केला आहे. कमला हॅरिस यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून, अमेरिकेत हिंसाचाराला थारा नसल्याचे म्हंटले आहे.
And no one is even trying to assassinate Biden/Kamala 🤔 https://t.co/ANQJj4hNgW
— Elon Musk (@elonmusk) September 16, 2024
देशाची गुप्तचर संस्था एफबीआयनेही ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारासंदर्भात निवेदन जारी केले आहे. एफबीआयने सांगितले की, “रविवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास फ्लोरिडातील आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्सजवळ ही घटना घडली. एफबीआयने या घटनेला हत्येचा प्रयत्न म्हटले असून तपास सुरू केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.