Aditi Rao Hydari : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंतच्या फिल्मी कॉरिडॉरमध्ये लग्नाचा मोसम सुरू आहे. अलीकडेच तापसी पन्नूने गुपचूप लग्न करून तिच्या चाहत्यांना धक्का दिला. यानंतर आता अभिनेत्री अदिती राव हैदरीने देखील गुपचूप लग्न करून चाहत्यांना धक्का दिला आहे. अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून साऊथ अभिनेता सिद्धार्थसोबत नात्यामध्ये होती. अशातच आता तिने गुपचूप लग्न उरकून आपल्या चाहत्यांना धक्का दिला आहे. अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो आपल्या सोशल मीडिया हँडल इंस्टग्रामवर शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये आदिती पती सिद्धार्थसोबत खूप आनंदी दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर चमक दिसून येत आहे. फोटोंमध्ये दोघांमधील बॉन्डिंग आणि केमिस्ट्री देखील दिसून येत आहे. फोटोंमध्ये दोघेजण लग्नाचे विधी करताना दिसत आहे. फोटोंवरून लक्षात येते दोघांच्या लग्नाला फक्त कुटुंब, मित्र आणि जवळचे लोक उपस्थित होते. हे लग्न दाक्षिणात्य परंपरेने पार पडले. पोस्ट शेअर करण्यासोबतच आदितीने सिद्धार्थसाठी एक अप्रतिम कॅप्शनही लिहिले आहे.
कॅप्शनमध्ये अदितीने लिहिले ‘तूच सर्वस्व आहेस…” पुढे लिहिले, “तू माझा सूर्य, चंद्र आणि तारा आहेस. जन्मभर माझा सोबती होण्यासाठी…मला हसवण्यासाठी, जीवनात प्रेम आणण्यासाठी तझे आभार.” अशी नोट अभिनेत्रीने आपल्या फोटोंसह सोशल मीडियावर शेअर केली आहे.
https://www.instagram.com/p/C_95cVpSt7H/?utm_source=ig_web_copy_link
आदितीची पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर आला आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हा, अनन्या पांडे, संजीदा शेख, अथिया शेट्टी, झहीर इक्बाल, रिद्धिमा तिवारी या सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे, ज्यांनी या जोडप्याला नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तुमच्या माहितीसाठी अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ या दोघांचे हे दुसरे लग्न आहे. सिद्धार्थने 2003 मध्ये मेघना नारायण यांच्याशी पहिले लग्न केले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि 2007 मध्ये दोघे वेगळे झाले. त्यांच्या नात्याच्या तुटण्यामागच्या कारणाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते पण खरे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. अदितीबद्दल बोलायचे झाले तर तिने वयाच्या २१ व्या वर्षी सत्यदीप मिश्रासोबत पहिले लग्न केले. पण, त्यांचे नातेही अवघ्या चार वर्षांत तुटले.
याशिवाय अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांच्या अफेयरबद्दल बोलायचे झाले तर ते ‘महा समुद्रम’ चित्रपटादरम्यान भेटले होते आणि यादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढल्याचे सांगितले जाते. यानंतर दोघेही अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. जिथून दोघांच्या नात्याची बातमी समोर आली.