Ganesh Utsav 2024 : दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो (Ganesh Utsav 2024). दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचे वातावरण अगदी आनंदी आणि समाधानी असते. यावर्षी देखील महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. आज आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन (Ganesh Visarjan Miravnuk) करण्यात येणार आहे.
दरवर्षीच गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात विसर्जन केले जाते. यावर्षी देखील जल्लोषात गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. मुंबईतील अनेक मोठ्या गणपतीचे विसर्जन हे गिरगाव चौपाटीवर केले जाते. हे विसर्जन दोन दिवस सुरु असते परंतु यावर्षी रात्री अकरा पर्यंतच गणपती विसर्जन करण्यास सांगितले आहे कारण मंगळवारी रात्री 11 वाजता समुद्रात मोठी भरती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील अनेक मंडळाचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर केले जात असून गणेशाच्या मूर्तीसह मंडळाचे अनेक कार्यकर्ते पाण्यात जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात. परंतु रात्री 11 वाजता समुद्रात भरती येण्याची शक्यता आहे यामुळे 11 नंतर पाण्यात जाणे धोक्याचे ठरू शकते यामुळेच सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन रात्री अकराच्या आधीच करण्यात येतील .
दरम्यान, गणेश विसर्जन करताना काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. समुद्रकिनाऱ्यावर दंश करणारे मासे तसेच ढोमी, कोळंबी, स्टिंग रे , जेली फिश, शिंगटी, ब्लू जेली फिश, घोडा मासा, छोटे रावस मासे या प्रकारचे मासे मत्स्यविकास विभागाच्या पाहणीत आढळले आहेत. यामुळे गणपती विसर्जनासाठी पाण्यात उतरताना काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.