Ganesh Chaturthi 2024 : दहा दिवसांच्या गणपती (Ganpati) बाप्पाच्या विसर्जनासाठी सर्व मंडळांनी जोरदार तयारी केली आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाचे आज विसर्जन होणार आहे. मुंबई (Mumbai) पुण्यासह (Pune) इतर शहरांतील गणपतीची विसर्जन मिरवणूक देखील जल्लोषात निघणार आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अनेक वाहतूक अटी आणि नियम लागू केले आहेत.
सार्वजनिक मंडळं ढोल-ताशे, डीजेच्या तालावर वाजत गाजत दरवर्षी मिरवणूक काढतात. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाढतुक कोंडी होते. त्यामुळेच ठाणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आलेले आहेत. आज (17 सप्टेंबर) दुपारी 2 वाजल्यापासून रात्री गणेशाचे विसर्जन होईपर्यंत हे वाहतूक नियम लागू असणार आहेत असे वाहतूक अधिसूचनेत सांगण्यात आले आहे.
ठाणे स्टेशनकडून टॉवर नाका टेंभी नाकाकडे जाणाऱ्या वाहनांना मूस चौक व टॉवर नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे त्यामुळे सॅटिस ब्रिज वरून येणाऱ्या एसटी टीएमटी बसेस बी केबिन सॅटिस वरून गोखले रोड मार्गे जातील असे सांगण्यात आले आहे. याचसोबत रिक्षा, चार चाकी, लहान वाहने सॅटिस ब्रिज खालून मूस चौक येथून सरळ टॉवर नाका टेंभी नाका मार्गे जाण्यास सांगण्यात आले आहे.
क्रिक नाका मार्गे सिडकोकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना क्रीक नाका येथे प्रवेश बंदी केली असून क्रीक नाका येथून कोर्ट नाका मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा जांभळी नाका बाजारपेठ स्टेशन रोड मार्ग वाहनांना वापरण्यास सांगितला आहे.
जीपीओ कोर्ट नाका येथून ठाणे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रवेश बंद असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जांभळी नाका बाजारपेठ स्टेशन रोड मार्गे एवंन फर्निचर मार्ग वापरण्यास सांगण्यात आला आहे
चरई व सिविल हॉस्पिटलकडून टेंभी नाकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनपा शाळा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी बाबासाहेब आंबेडकर चौक इथून जांभळी नाका बाजार स्टेशन रोड हा मार्ग वाहतुकीसाठी सांगण्यात आला आहे.a