Ajit Pawar : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीने कंबर कसली असून, महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. कार्यकर्ते आपापल्या नेत्याला मुख्यमंत्री पाहत आहेत, तसेच महायुती मध्ये शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंचं नाव पुढे केले जात आहे तर अजितदादांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांचं नाव पुढं केलं जात आहे.
अशातच आता मुख्यमंत्री पदाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘पहिल्यांदा महायुतीच सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही सर्वजण बसून निर्णय घेऊ तसेच आत्ताच्या विधानसभा निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत अस ते यावेळी म्हणाले आहेत.
ते पुण्यात गणेश विर्सजन मिरवणुकीत बोलत होते, त्यांनी पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा करून आरती केली त्यानंतर अखिल मंडई मंडळात देखील आरती केली. यावेळी त्यांना याबाबत विचारण्यात आले.
मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार म्हणाले की, “सर्वच कार्यकर्त्यांना वाटत असते की आपापला नेता हा मुख्यमंत्री व्हावा पण सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी असं होत नाही. मुख्यमंत्री पदाबाबत 145 चा मॅजिक आकडा पार करावा लागतो. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मतदार राजा असतो. त्याच्या हातात असते कोणाला मतदान करायचे. अस ते यावेळी अजित पवार म्हणाले.”
पुढे त्यांनी गणेश भक्तांना तसेच मंडळांना लवकर विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. बाप्पाला निरोप देताना अजितदादा म्हणाले, “अतिशय उत्साहात राज्यातील जनतेने उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पांचं स्वागत केलं आहे. आणि आज बघता बघता 11 वा दिवस उजाडला आहे. आणि आज गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणण्याची वेळ आली आहे. थोडस मन जड झाल आहे. आतापर्यंत सर्वांनी अतिशय चांगले काम केले आहे विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडावी. अस यावेळी अजित पवार म्हणाले.