अतिशय कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा ( Maharashatrachi Hasyajatra). महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार करत असतात. प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला प्रतिसाद देखील मिळत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाक्षेत्रात प्रवेश करणाऱ्या अनेक नवीन कलाकारांना स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची संधी देखील मिळत असते.
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातीलच कलाकार निखिल बने (Nikhil Bane ) याने अतिशय कमी वेळात प्रेक्षकांचा पाठिंबा मिळवला आहे. त्याने अनेक वेगवेगळ्या विनोदी भूमिका साकारलेल्या आहेत. त्याचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल आहे तसेच तो इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ शेअर करत असतो. सध्या त्याने कोकणातील गणपती (Ganpati ) विसर्जनाचा एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/C_8JWJitxmR/?utm_source=ig_web_copy_link
हा व्हिडिओ पोस्ट करताना निखिलने ‘आम्हा आज्ञा आज्ञा’ असे कॅप्शन लिहिलेले आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कोकणातील गणपतीचे विसर्जन कसे केले जाते याची झलक पाहायला मिळत आहे. कोकणात पाण्याच्या नदीच्या काठी एकत्र येऊन गाऱ्हाण करून आरती तसेच बाप्पाचे विसर्जन केले जाते आणि मग लाह, गूळ-खोबरे आणि शेंगदाणे एकत्रित प्रसाद बनवून वाटप केले जाते निखिलने पोस्ट केलेल्या व्हिडिओ मधून हे सर्व आपल्याला दिसत आहे.
दरम्यान, निखिलने शेअर केलेल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून कोकणातील गाव, रीती-भाती, संस्कृती, कोकणातील कौलारूं घरे, भजने हे आपल्याला पाहायला मिळते.