राजकीय वर्तुळात आगामी निवडणुकांच्या (Vidhansabha Elections)पार्श्वभूमीवर चर्चासत्र सुरूच आहे. अनेक नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. असे असतानाच आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा महायुतीतून चेहरा नक्की कोणाचा ? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत असतानाच आता एकनाथ शिंदेच ( Eknath Shinde) मुख्यमंत्री होणार असा दावा करण्यात येत आहे. अशातच आता महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा चेहरा समोर येणार हाच प्रश्न सर्वांना पडला आहे?
दरम्यान, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसच त्यांच्या मनातील चेहरा आहेत हे जाहीर करुन टाकले आहे. नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गिरीश महाजन बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ अजित गोपछडे, तसेच आमदार आणि सर्वच विभागातील अधीकारी, कर्मचारी, तसेच नागरिक उपस्थित होते.
450 कोटी रुपयांची मदत आम्ही यावर्षी शेतकऱ्यांना दिली आहे. जे पंचनामे झाले त्याची मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे असे भाष्य गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना केले आहे. त्यासोबत मराठा आरक्षणाविषयी बोलताना गिरीश महाजन म्हणाले आहेत की, दहा टक्के आरक्षण देण्यात आले असून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावी ही भूमिका सरकारची आहे. आम्हाला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे.
दरम्यान, 100 टक्के सरकार तरेल घोडा मैदान समोर आहे पुढे काय काय होते ते बघा. पुन्हा आमचा महायुतीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.