Atishi Marlena : आतिशी आता दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी (AAP) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. या निर्णयाला आमदारांनी देखील सहमती दर्शवली. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. याआधी दिवंगत सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सांयकाळी उपराज्यपालांची भेट घेवून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवतील.
दरम्यान, आतिशी यांच्या निवडीवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल (Swati Maliwal) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आतिशी यांच्या निवडीवर जोरदार टीका करत आजचा दिवस अतिशय दु:खद दिवस असल्याचे म्हटले आहे.
दिल्ली के लिए आज बहुत दुखद दिन है। आज दिल्ली की मुख्यमंत्री एक ऐसी महिला को बनाया जा रहा है जिनके परिवार ने आतंकवादी अफ़ज़ल गुरु को फांसी से बचाने की लंबी लड़ाई लड़ी।
उनके माता पिता ने आतंकी अफ़ज़ल गुरु को बचाने के लिए माननीय राष्ट्रपति को दया याचिकाऐं लिखी।
उनके हिसाब से… pic.twitter.com/SbllONqVP0
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) September 17, 2024
स्वाती मालिवाल यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आतिशी यांच्या निवडीबाबत म्हंटले की, “दिल्लीला एक अशा महिला मुख्यमंत्री आज लाभल्या आहेत, ज्यांच्या कुटुंबाने दहशतवादी अफजल गुरु याला वाचण्यासाठी प्रदीर्घ लढा दिला. त्यांच्या आई-वडिलांनी अफजल गुरुला वाचवण्यासाठी राष्ट्रपतींकडे दया याचिकेचा अर्जही केला होता.
त्यांच्या मते अफजल गुरु निर्दोष होता आणि त्याला राजकीय षडयंत्रातून अडकवलं गेलं होतं. तसं आतिशी मार्लेना या केवळ ‘Dummy CM’ आहेत. तरीही हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी निगडीत आहे. देव दिल्लीचं रक्षण करो. असं स्वाती मालिवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.