Haryana Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी मंगळवारी (17 सप्टेंबर) भिवानी येथे जाहीर सभेला संबोधित केले. या सभेत अमित शहा यांनी अग्निवीर योजनेबाबत मोठा दावा केला. तसेच यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले.
गृहमंत्री अमित शहा यांनी भिवानी घेतलेल्या सभेत म्हंटले, ‘विरोधी पक्ष, राहुल गांधी आणि हुड्डा परिवार अग्निवीर योजनेबाबत देशातील तरुणांमध्ये संभ्रम पसरवत आहेत. यासोबतच अग्निवीर योजनेबाबत गृहमंत्र्यांनी तरुणांना मोठी हमी दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मी हरियाणातील सर्व अग्निशमन योद्धांना हमी देतो की ते सैन्यातून परतल्यावर त्यांना नोकरी देऊ.”
पुढे काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हंटले, काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा एकच अजेंडा आहे की त्यांना पाकिस्तानशी चर्चा करून दहशतवाद्यांना मुक्त करायचे आहे. ते म्हणाले की, काँग्रेसला कलम 370 परत आणायचे आहे, पण ते कधीही असं करू शकणार नाहीत.
या रॅलीत अमित शाह यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबतही वक्तव्य केले, ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरही आमचा आहे, तोही भारताचा भाग आहे. पुढे त्यांनी हरियाणाची भूमी ही वीरांची भूमी असल्याचे देखील म्हंटले. हरियाणातील सैनिक आज देशात लष्कराचा मान वाढवत असल्याचे त्यांनी या सभेत म्हंटले आहे.
पुढे हरियाणातील खेळाडूंबद्दल ते म्हणाले, ‘ऑलिम्पिक असो किंवा पॅरालिम्पिक…आमच्या हरियाणातील तरुणांनी सर्वत्र देशाचा गौरव केला आहे.
काँग्रेसवर हल्लाबोल
हरियाणा काँग्रेस आपसात लढत आहे. येथील प्रत्येक काँग्रेस नेत्याला मुख्यमंत्री व्हायचे आहे. अमित शाह पुढे म्हणाले की, हरियाणात भूपेंद्र हुड्डा सरकार असताना स्लिप आणि खर्चाच्या माध्यमातून नोकऱ्या दिल्या जात होत्या, मात्र भाजप सरकारमध्ये सर्व काही पारदर्शक पद्धतीने केले जाते.” असे म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.