Jammu Kashmir 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) 10 वर्षांनंतर आज विधानसभा निवडणुका (Assembly elections 2024) होत आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 18 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज सकाळी 7 वाजता कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरू झाले आहे. आज पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी जम्मू-काश्मीरमधील 24 जागांवर मतदान (Jammu and Kashmir Votes) होत आहे. केंद्रातील भाजप (BJP) सरकारने जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे.
पुढील टप्प्यांसाठी टोन सेट करण्यासाठी मतदानाचा पहिला टप्पा महत्त्वाचा आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजेपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 11.11 टक्के मतदान झाले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, जम्मू आणि काश्मीरच्या 24 विधानसभा जागांसाठी 219 उमेदवार रिंगणात आहेत, त्यात 90 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. या 219 उमेदवारांचे भवितव्य आज 23 लाखांहून अधिक मतदार ठरवणार आहेत. तुमच्या माहितीसाठी ज्या 24 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे त्यामध्ये जम्मूच्या तीन जिल्ह्यांतील 8 विधानसभा जागा आणि काश्मीर खोऱ्यातील चार जिल्ह्यांतील 16 विधानसभा जागांचा समावेश आहे.
J-K Assembly polls: 11.11% turnout recorded till 9 am in first phase of polls
Read @ANI Story | https://t.co/oE4zZvML4j#JammuKashmirelection #Voterturnout #voters #JammuAndKashmir pic.twitter.com/RyCeadfNKX
— ANI Digital (@ani_digital) September 18, 2024
जम्मू-काश्मीरमधील 24 विधानसभा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अधिकारी सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये चार महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी शांतेतत मतदान (Voting) होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याच पार्श्ववभूमीवर पहिल्यात टप्प्यात होत असलेल्या मतदानासाठी केंद्र सरकारने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.