Serial Blasts : लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये मंगळवारी झालेल्या मालिका बॉम्बस्फोटांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. संवादासाठी वापरल्या जाणाऱ्या पेजर्सचा एकाचवेळी स्फोट झाल्याने ही घटना घडली. या स्फोटामुळे हिजबुल्लाह सैनिक, नागरिक आणि डॉक्टरांसह 3,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिजबुल्लाहच्या अनेक सैनिकांसह आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
शहरात सुमारे तासभर स्फोट सुरूच होते. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी दुपारी ३.४५ वाजता हे स्फोट झाले. मात्र, पेजर गॅजेटचा स्फोट कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही?
मिळालेल्या माहितीनुसार लेबनॉनमधील इराणचे राजदूत मोजतबा अमानी हे देखील या स्फोटात जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लास्ट झालेले पेजर हे अलिकडच्या काही महिन्यांत हिजबुल्लाहने आणलेले नवीनतम मॉडेल होते.
शहरात घबराटीचे वातावरण
मालिका बॉम्बस्फोट झाल्यापासून बेरूतमध्ये रस्त्यावर रुग्णवाहिका धावताना दिसत आहेत. बॉम्बस्फोटानंतर या ठिकाणी भीतीचे वातावरण आहे. लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागात अनेक पेजरचा स्फोट झाल्याचे देश हादरला आहे.
या स्फोटाचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बॉम्बस्फोटात जखमी झालेले लोक वेदनेने ओरडताना दिसत आहेत. तसेच रस्त्यावर आणि बाजारपेठेत गोंधळाचे वातावरण आहे.
अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारली नाही
लेबनॉनमध्ये झालेले पेजर स्फोट कसे झाले? कोणी केले? याची अधिकृतरित्या कोणीही जबाबदारी घेतली नाही. पण इस्त्रायलवर आरोप होत आहे. हे पेजर तैवानची कंपनी गोल्ड अपोलोने बनवले असल्याचे म्हटले जाते. परंतु कंपनीकडून नकार दिला जात आहे. हिजबुल्लाह आधुनिक मोबाईल ऐवजी जुने तंत्रज्ञान असलेले पेजर वापरत होती. कारण हिजबुल्लाहच्या अतिरेक्याचा ट्रेस लागू नये? हॅकींग होऊ नये.