दरवर्षीच मुंबई (Mumbai) पुणे (Pune) या ठिकाणी गणपती पाहण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी गणपतीचे (Ganpati) दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्याचा दिवस हा अविस्मरणीय असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणपती बाप्पाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन केले गेले. मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. ढोल ताशांच्या गजरात गणपतीचे बाप्पाचे विसर्जन केले जाते.
मुंबईतील गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे सकाळी विसर्जन करण्यात आले आहे. तब्बल 25 तास लालबागच्या राजाची मिरवणूक काढण्यात आली होती. पुण्यामध्ये देखील गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष सुरू आहे. काल सकाळी साडेदहा वाजता गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
पुण्यात गणपती विसर्जनाला सुरुवात होऊन 28 तास उलटून गेले आहेत. आत्तापर्यंत 189 गणेश मंडळे अलका चौकातून गेली आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंत 172 मंडळ अलका टॉकीज चौकातून क्रॉस झाली आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणपती विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन देखील गणेश मंडळांना केले आहे.
दरम्यान, पुण्यातील विसर्जन मिरवणूक यावर्षी देखील संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी डी जे वाजवणाऱ्या मंडळांवर कारवाई करायला सुरुवात केली यानंतर वाद देखील निर्माण झाला होता.