राज्यात गणेश (Ganpati) विसर्जनाचा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा केला झाला. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणेश विसर्जनाची मिरवणूक देखील अनेक ठिकाणी काढण्यात आली. परंतु गणेश विसर्जनादरम्यानचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाण्यातील (Buldhana) जळगाव (Jalgaon ) जामोद (Jamod) मध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये वाद झाला. या वादात दगडफेकीची घटना देखील घडली.
यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील 15 गणेश मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणूक जागेवरच थांबवली असून जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत ही मिरवणूक पूर्ण होणार नाही असे मंडळाकडून सांगण्यात आले.
काल रात्री साडेबाराच्या दरम्यान गणपती विसर्जन मिरवणुकीत वाद होऊन दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काही काळ रस्त्यातच ठिय्या आंदोलन केले पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठी चार्ज देखील केला .
पोलिसांनी आता या घटनेतील संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबतची सर्व माहिती सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे. पोलिसांनी सीसीटिव्ही तपासले असून अज्ञात व्यक्ती आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई सुरू केली आहे.
दरम्यान, अद्याप 12 तास उलटून गेल्यानंतर गणेश मुर्तीच विसर्जन झालेल नसून आरोपींना अटक होईपर्यंत विसर्जन करणार नाही, अशी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली आहे. विसर्जन मिरवणूक लवकर व्हावी यासाठी मंडळांशी पोलिसांनी बोलणे सुरू केली आहे. यामुळे लवकरच विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल असे सांगितले जात आहे.