जम्मू काश्मीरमध्ये (jammu kashmir)आज विधानसभा निवडणुकीला( Vidhansabha Elections 2024) सुरुवात झाली आहे. आज पहिला टप्प्यातील मतदान सुरू असून पहिल्या टप्प्यातील चार जागांवर सर्वांचीच नजर आहे. या चार जागांमध्ये बिजबेहरा, कुलगाम, अनंतनाग, पुलवामा सिटी या जागांचा समावेश आहे. यामधील बिजबेहराची या जागेवर मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती या निवडणूक लढवत आहेत.
कुलगाम या जागेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे मोहम्मद युसूफ तारिगामी यांना उमेदवारी देण्यात आली असून पीपल्स काँन्फ्रेन्समधून अहमद लावे यांना उमेदवारी दिली आहे. अनंतनाग या जागेसाठी पीरजादा मोहम्मद सईद निवडणुकीच्या रिंगणात असून पीडीपीने अनंतनागहून महबूब बेग यांना निवडणुकीसाठी उभे केले आहे.
पुलवामामधून पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी आणि नॅशनल काँन्फ्रेन्समध्ये थेट लढत आहे. पीडीपीने वहीद उर रहमान पारा यांना निवडणुकीसाठी उभे केले असून नॅशनल काँफ्रेंन्सने मोम्मद खलील बंदला यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर आज दहा वर्षानंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. सात जिल्ह्यांमधील 24 विधानसभा जागांवर या निवडणुका होत असून या निवडणुकीसाठी 219 उमेदवार उभे राहिलेले आहेत.