सध्या देशभरात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Elections 2024 ) जोरदार तयारी सुरू आहे. जम्मू काश्मीर (Jammu kashmir )मध्ये विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर रोजी म्हणजेच काल पार पडले आहे. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी आज (19 सप्टेंबर ) श्रीनगर (Srinagar) आणि कटरा (Katara ) येथे निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत.
आज दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियममध्ये सार्वजनिक सभा घेणार आहेत. यानंतर दुपारी 3 वाजता कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये नरेंद्र मोदी सार्वजनिक सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदींचा जम्मू-काश्मीर दौरा गेम चेंजर ठरेल असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी बुधवारी शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमला भेट दिली आहे. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले आहेत की, पंतप्रधानांवर जम्मू आणि काश्मीरचे लोक खूप प्रेम करतात. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरला येतात तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्यांचे स्वागत करतात हे याआधी देखील आपण पाहिले आहे.यामुळेच आता पंतप्रधानांचा जम्मू-काश्मीर दौरा गेम चेंजर ठरेल.
पंतप्रधानांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यादरम्यान पोलिसांकडून त्यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या माध्यमातून सुरक्षा देण्यात येणार आहे. स्पेशल प्रोटेक्शन टीम श्रीनगरमध्ये चार दिवसांपूर्वीच आली आहे. व्हीव्हीआयपी संरक्षकांच्या सुरक्षेसाठी केंद्रशासित प्रदेशातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी स्पेशल प्रोटेक्शन ही टीम श्रीनगरमध्ये आली आहे.
पंतप्रधानांची निवडणूक रॅली सुरळीतपणे पार पडावी यासाठी 19 सप्टेंबर रोजी काही वाहतूक वळवण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधानांच्या भेटीसाठी अशा भेटीचे नियमन करणारी एक तपशीलवार मानक कार्यप्रणाली (SoP) आहे आणि आम्ही त्या नियमांचे अनुकरण करत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
दरम्यान, कार्यक्रमस्थळाच्या आजूबाजूच्या सर्व उंच इमारती सुरक्षा दलांच्या ताब्यात असतील असे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.