सर्वच पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Elections 2024 ) तयारी करत आहेत. जम्मू काश्मीर (Jammu kashmir ) मध्ये विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. 25 सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र(Narendra Modi) मोदी आज ( 19 सप्टेंबर ) श्रीनगर (Srinagar) आणि कटरा (Katara ) येथे निवडणूक रॅलींना संबोधित करत आहेत. सध्या श्रीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा चालू असून मोठ्या संख्येने लोक या प्रचार सभेला उपस्थित आहेत.
या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधानांनी राहुल गांधींवर देखील जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, “या लोकांनी द्वेषाची दुकाने उघडली आहेत. शाळा जाळल्या आहेत, तरुणांना शिक्षणापासून वंचित ठेवले आहे अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींना टोला लगावलेला आहे.
नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस कुटूंब या तीन कुटुंबांनी काश्मीरला उद्ध्वस्त केले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. आता ही तिन्हीही कुटुंब अस्वस्थ आहेत. जम्मू-काश्मीर मिळावे असे या तीन कुटुंबांना वाटते पण आता जम्मू-काश्मीर या कुटुंबांच्या ताब्यात राहणार नाही असे वक्तव्य त्यांनी केले आहे. याचसोबत पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले आहेत की, जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाने दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना नाकारलेले आहे हे आपल्याला दिसून येत आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे बुधवारी 24 जागांवर पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. या जागांवर सुमारे 61.3 टक्के मतदान झाले आहे. गेल्या सात निवडणुकांमधील हे सर्वाधिक मतदान आहे. यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरमध्ये बोलताना म्हणाले आहेत की, काश्मीरमध्ये पहिल्यांदाच दहशतवादाच्या सावलीशिवाय मतदान झाले आहे यामुळे जनतेचे आभार मानतो.