सध्या देशभरात तिरुमला तिरुपती (Tirumalla Tirupati) देवस्थानाच्या लाडूचा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेचा बनला आहे. या मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याच्या आरोपावरून वाद सुरु असून या वादावर दुग्धजन्य पदार्थ बनविणारी प्रसिद्ध कंपनी अमूलने स्पष्टीकरण दिले आहे.तिरुपती देवस्थानाला आम्ही तूप दिले नाही असे अमूल कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती मंदिरात वापरण्यात येणारे तूप भेसळयुक्त आढळून आले. टीटीडीला तूप दुग्धजन्य पदार्थ बनविणारी प्रसिद्ध कंपनी अमूलने पुरवले होते, असे सांगून काही लोकांनी खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे असे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता म्हटले आहेत. यामुळेच अमूल कंपनीने हमदाबाद पोलिसांच्या सायबर क्राईम शाखेत “चुकीची माहिती मोहिमे” विरोधात एफआयआर दाखल केला आहे असे देखील जयेन मेहता यांनी सांगितले आहे.
अमूलची उत्पादने उच्च दर्जाची असतात आणि उत्पादनांची गुणवत्ता तपासणी कडक केली जाते. त्यामुळे टीटीडीला तूप अमूलने पुरवले होते अश्या प्रकारच्या चुकीच्या माहितीपासून दूर राहण्याचे आवाहन आम्ही लोकांना करतो असे देखील जयेन मेहता म्हणाले आहेत.
तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याच्या वादात अमूल कंपनीचे नाव येत आहे आता यावरूनच दुग्धजन्य पदार्थ बनविणाऱ्या प्रसिद्ध अमूल कंपनीने एक्स अकाउंटवर एक निवेदन दिले आहे. “तिरुमला तिरुपती देवस्थानमला (TTD) अमूल कंपनीकडून तूप पुरवठा केला जात असल्याचा उल्लेख करणाऱ्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यामुळे आम्ही हे कळवू इच्छितो की आम्ही TTD ला अमूल कंपनीने तूप पुरवठा कधीच केला नाही,” असे कंपनीने केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात तिरुपतीच्या मंदिरात पवित्र प्रसाद लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावण्याचे काम केले आहे असे आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी केले होते,