PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मोदींनी (Narendra Modi) त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेतील भारतीयांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. तसेच भारताची प्रगती झपाट्याने कशी होत आहे याबद्दलही माहिती दिली.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांचेही कौतुक केले आणि त्यांना भारताचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून संबोधले. तुम्ही भारताला अमेरिकेशी आणि अमेरिकेला भारताशी जोडले आहे, असं ते यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना भारताला आपले वर्चस्व नको आहे, तर जगाच्या भरभराटीसाठी भूमिका बजावायची आहे, असेही स्पष्ट केले. मोदींनी आपल्या भाषणात कोणते प्रमुख मुद्दे उचलेल जाणून घेऊया…
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
-लवकरच भारतातही ऑलिम्पिक दिसेल. 2036 ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.
-आज भारताची 5G बाजारपेठ अमेरिकेपेक्षा मोठी आहे. दोन वर्षांत भारताने ही कामगिरी केली आहे. आता, भारत मेड-इन-इंडिया 6G वर काम करत आहे.
-अमेरिकेत राहणारे भारतीय भारताचे सर्वात ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. दोन्ही देशांच्या मध्ये पूल म्हणून कामगिरी करत आहेत.
-तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्हाला अमेरिकेत मेड-इन-इंडिया चिप पाहायला मिळतील. ही छोटी चिप विकसित भारताच्या उड्डाणाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. ही मोदींची हमी आहे.
-आज भारत जागतिक मंचावर काही बोलतो तेव्हा जग ऐकते. काही काळापूर्वी जेव्हा मी म्हणालो की हे युद्धाचे युग नाही, तेव्हा सर्वांना त्याचे गांभीर्य समजले. जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा भारत प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून पुढे येतो.
-भारताचे प्राधान्य जगामध्ये दबाव वाढवणे नाही तर प्रभाव वाढवणे आहे. ‘आम्ही आगीसारखे जळणार नाही, सूर्यकिरणांसारखे प्रकाश देणार आहोत’. आम्हाला जगात वर्चस्व नको आहे, तर आमचे वर्चस्व हवे आहे.
-माझ्यासाठी AI म्हणजे अमेरिका- इंडिया. हीच भावना भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर घेऊन जात आहे.
-भारत ही आता संधींची भूमी आहे. तो यापुढे संधींची वाट पाहणार नाही, संधी निर्माण करणार. गेल्या 10 वर्षांत, भारताने प्रत्येक क्षेत्रात संधींचे लॉन्चिंग पॅड तयार केले आहेत.
-आम्ही हरित संक्रमणाचा मार्ग निवडला. निसर्गावरील प्रेमाची आमची परंपरा आम्हाला मार्गदर्शन करते आणि आम्ही सौर आणि पवन ऊर्जा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहोत. पॅरिस हवामान उद्दिष्टे साध्य करणारा भारत हा पहिला G20 देश आहे.
-प्रत्येक आकांक्षा नवीन यशाला जन्म देते आणि प्रत्येक यश नवीन आकांक्षेचे उत्प्रेरक बनते. एका दशकात भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत 10व्या स्थानावरून 5व्या स्थानावर गेला आहे. आता त्याने तिसरे यावे असे प्रत्येक भारतीयाला वाटते.